नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये केरमन इथं कमांडर सुलेमानी यांच्या जन्मगावी त्यांच्या अंत्ययात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 50 नागरिक मरण पावल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. अंत्ययात्रेला सुलेमानींच्या अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी झाली होती. ही गर्दी लक्षात घेता सुलेमानी यांच्यावरील अंत्यसंस्कार काहिसे उशिराने झाले.
स्थानिक प्रसिद्धी माध्यमांच्या माहितीनुसार चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 50 वर गेला असून, सुमारे 200 जण जखमी झाले आहेत. गेल्या शुक्रवारी अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यात कमांडर सुलेमानी मारले गेले.