नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये तेहरान इथं आज विमानतळानजीक युक्रेनचं विमान कोसळलं. विमानात १७६ प्रवासी आणि कर्मचारी होते. विमानानं इमाम खोमैनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झेप घेतली आणि काही मिनिटातच ते कोसळलं.
आकाशात झेपावल्याक्षणीच विमानाचा संपर्क तुटला होता त्यानंतर एका इंजिनाने पेट घेतला आणि वैमानिकाच्या हातून नियंत्रण सुटलं. त्यावरून तांत्रिक कारणांमुळेच विमान कोसळलं असावं, असा अंदाज आहे. इराकमधील अमेरिकी तळांवर इराणनं केलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर काही तासांनी हा अपघात झाला