नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं हवाई वाहतूक क्षेत्रात समतोल साधत तीव्र गतीनं विकास केला आहे, असं वक्तव्य केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांनी केलं.
विंग्स इंडिया २०२० या हैदराबाद इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या आधी नवी दिल्ली इथं आयोजित एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. या विभागाचं संरचनात्मक खासगीकरण केलं जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
या वर्षी ९ मार्च ते १२ मार्च दरम्यान हैदराबाद इथं हे प्रदर्शन आयोजित केलं आहे. देशातली सर्व विमानतळं आधुनिक केली जाणार आहेत आणि त्यांचा विस्तार केला जाणार आहे. दिल्ली विमानतळाची प्रवासी हाताळण्याची क्षमता प्रतीवर्षी ७० दशलक्ष पर्यंत वाढली आहे, असंही ते म्हणाले.