नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्वाललंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधूचं आव्हान आज महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतच आटोपलं. तैवानच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या ताई यींग झू हिनं सिंधूला आज २१-१६, २१-१६ असं हरवलं.

स्पेनच्या जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या  कॅरोलीना मरीननं अकराव्या स्थानावरच्या सायनाचा २१-८, २१-७ असा दारुण पराभव केला. पुरुष एकेरीतून सर्वच भारतीय बॅडमिंटनपटू याआधीच गारद झाले असल्यामुळे भारताचं या स्पर्धेतलं एकंदर आव्हानही संपुष्टात आलं आहे.