नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी जनतेच्या मनात काही राजकीय पक्ष विश्वास निर्माण करण्याऐवजी संभ्रम निर्माण करण्यांच काम करत आहेत, अशी टीका केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केली आहे.
ते लखनौ इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काही राजकीय पक्ष चुकीचा प्रचार करुन युवावर्गाची दिशाभूल करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. या कायद्याअंतर्गत असलेल्या तरतूदी पूर्ण केल्यानंतर सुमारे ५०० मुस्लिमानां भारतीय नागरिकत्व मिळालं असून त्यात पाकिस्तानातल्या काही आश्रितांचाही समावेश आहे, असं नकवी यांनी सांगितलं.