पिंपरी :  महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शिवाजी महाराज हे दोन महापुरुष एकाच युगात जन्मले असते तर भारताने संपूर्ण जगावर राज्य केले असते, असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त निगडी येथील त्यांच्या अर्धाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या सुमन पवळे, कमल घोलप, नगरसदस्य प्रा.उत्तम केंदळे, स्वीकृत सदस्य जितेंद्र यादव, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे,  प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, नायब तहसिलदार एन.टी.परदेशी, राजपुत समाज संघठन पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष शिवकुमारसिंह बायस, जयसिंह राजपूत, कैलाससिंह चौहान, विजयसिंह राजपूत, श्रीराम परदेशी, दिनेश राजपूत, सुरेश सुर्यवंशी, नारायण चंदेल, तुलसीदास राजपूत, दर्शना राजपूत, विक्रमसिंह राजपूत, अशोकसिंह इंगळे, किरण परदेशी, प्रविणसिंह राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले, महाराणा प्रताप हे शूर योध्दा होते. त्यांनी घालून दिलेला आदर्श जोपासला  पाहिजे.

महापौर राहूल जाधव म्हणाले, पिंपरी चिंचवड ही कष्टक-यांची नगरी, औदयोगिक नगरी आहे. यामध्ये विविध जाती – पातींचे लोक आनंदाने राहातात. सर्व समाजाला अभिप्रेत असलेले काम केले पाहिजे. माणुसकी हीच एक जात म्हणून सर्वांनी एकत्र येवून विकासांची कामे केले पाहीजे.