नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याशी संबंधित एका मनीलाँडरिंग प्रकरणी मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुतणे रतुल पुरी यांचा जामीन रद्द करण्याची सक्तवसुली संचालनालयाची विनंती दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

न्यायमूर्ती सुरेश कैत यांनी आज हा निर्णय दिला. याप्रकरणी इतर चार आरोपींना याआधीच जामीन मिळालेला आहे. तसंच पुरी यांनी शंभर दिवसापेक्षा जास्त काळ कोठडीत घालवला आहे, असं सांगत न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयाची विनंती फेटाळली.