नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीसीच्या एक दिवसीय क्रिकेटमधला “क्रिकेटर ऑफ द इयर” म्हणून भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याची २०१९ साठी निवड झाली आहे. रोहितनं या वर्षात दहा शतकं ठोकली, त्यापैकी पाच शतकं त्यानं विश्वचषक स्पर्धेत झळकावली आहेत.

विश्वचषक स्पर्धेत खिलाडू वृत्तीसाठीच्या “स्पिरिट ऑफ क्रिकेट” पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची निवड झाली आहे. विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या अष्टपैलू बेन स्टॉक्सला सर गारफील्ड सोबत करंडकासाठी निवडलं आहे.