नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी गुजरात राज्यातल्या हाजिरा इथं ५१ वी के ९ वज्र’ नावाची स्वयंचलित हॉवित्झर तोफ देशाला अर्पण केली. लार्सन ‍अँड  टुब्रो कंपनीनं तयार केलेली ही तोफ ५० टन वजनाची असून ती ४३ किलोमीटर अंतरापर्यंत ४७ किलो वजनाच्या  तोफ गोळयांचा मारा करु शकते, तसंच ती शून्य अंशात वळू शकते.

देशाला आज अर्पण केलेली के ९ वज्र’ ही तोफ खरोखरच भविष्यात शत्रुचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असं राजनाथ सिंग म्हणाले. २१ व्या शतकातल्या युद्धांसाठी अधिक अंतरावर जास्त शक्तिशाली मारा करण्याच्या दृष्टीनं अशी हत्यारं अत्यंत उपयुक्त आहेत, असं त्यांनी सांगितलं.

केंद्र सरकारच्या मेक इन-इंडिया कार्यक्रमाअंतर्गत भारत केवळ शस्रास्रं उत्पादक देश न राहता भविष्यात संरक्षणाविषयक सामग्रीचा प्रमुख निर्यातदार होईल, असं राजनाथ सिंग म्हणाले.