नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजिटल बँकीग व्यवहारांची सुरक्षा वाढवण्यासाठी डेबिट तसंच क्रेडीट कार्ड चालू आणि बंद करण्याची सुविधा स्वतः ग्राहकांनाच द्यावी, अशी सूचना भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्व व्यापारी बँका आणि कार्ड पुरवणाऱ्या इतर कंपन्यांना दिली आहे.

यापुढे भौतिक किंवा आभासी, कोणत्याही स्वरुपातलं कार्ड देताना. बँका आणि कार्ड पुरवणाऱ्या इतर कंपन्यांनी सर्व कार्ड देशातल्या एटीएम आणि पाँइट ऑफ सेलवर चालण्यासाठी सक्षम करावीत, तसंच आपली कार्डं स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कार्ड विरहित व्यवहारांसाठी, सक्षम करण्याची सुविधाही ग्राहकांना द्यावी, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.

या व्यवस्थेत मोबाईल अॅप्लीकेशन, इंटरनेट बँकीग, एटीएम किंवा आयव्ही आर एस यंत्रणेचा समावेश करावा, असंही बँकेनं म्हटलं आहे.