मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळावा यासाठी, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी नाशिक विभागातले सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली.
सर्व अधिकाऱ्यांनी सरकार सेवा केंद्राचे कर्मचारी तसेच अन्य क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावं असे निर्देश त्यांनी दिले. शेतकऱ्यांपर्यंत योजनेची माहिती पोचवून त्यांची आधारकार्ड बँक खात्यांशी जोडून घेण्याच्या सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.