पुणे : विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त, विद्युत अभियांत्रिकी विभाग, जेएसपीएमच्या राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय (एक स्वायत्त संस्था, एसपीपीयूशी संलग्न) पुणे यांनी 14 जानेवारी ते 16 जानेवारी या कालावधीत महावितरण, पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. या कार्यक्रमांची सुरूवात महाविद्यालय परिसरातील इलेक्ट्रिकल सेफ्टी रॅलीने झाली आणि त्यानंतर इलेक्ट्रिकल सेफ्टी वर पथनाट्य सादर केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोस्टर स्पर्धा व विद्युत सुरक्षा विषयावरील प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
पुढे महावितरणचे डॉ. संतोष पटनी, श्री.अभय केदारी, श्री. पुष्कर चौधरी, श्री. अनिरुद्ध कापरे यांनी विद्युत अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना शहरी व ग्रामीण भागातील व्यावसायिक इमारतीच्या विद्युत सुरक्षा ऑडिट व एचव्ही लाईनचे विद्युत सुरक्षा ऑडिट संबंधित मार्गदर्शन केले. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी युवा पिढी आणि नागरिकांना विद्युत सुरक्षेबाबत संवेदनशील करण्यासाठी ब्लासम पब्लिक स्कूल आणि सोनीगरा विहार हौसिंग सोसायटी, आदर्शनगर येथे जागरूकता सत्र आयोजित केले. तसेच सोनीगारा विहार हौसिंग सोसायटी व ताथवडे परिसरातील एचव्ही लाईनचे सेफ्टी ऑडिट तृतीय वर्षाच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमात आरएससीईईचे एकूण 250 विद्यार्थी सहभागी झाले होते.
प्रमुख अतिथी डॉ संतोष पटानी, उपप्रा. अभियंता, महावितरण, स्मार्ट ट्रेनिंग सेंटर, प्रकाशभवन, पुणे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले आणि मानवतेच्या सुरक्षिततेसाठी इलेक्ट्रिकल सेफ्टीचे महत्त्व सांगितले. उपप्राचार्य प्रो ए एस देवस्थळी यांनी असे कार्यक्रम समाजातील पुढील स्तरावर वाढवण्याविषयी सांगितले. श्री कमलाकर उन्हाळकर (जेएसपीएम संचालक), यांनी दररोजच्या जीवनात सुरक्षा नियम लागू करण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षण व प्लेसमेंट हेड श्री. एस. पी रावबोर्डे, विविध विभागांचे प्रमुख, विद्याशाखा सदस्य आणि शालेय शिक्षकांनी कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले. जेएसपीएम गटाचे संस्थापक सचिव डॉ. टी. जे. सावंत यांनी आयोजन समितीच्या प्रयत्नांचे कौतुक केले. विद्युत विभागाचे प्रमुख डॉ. एस. एल. चव्हाण यांनी आभार मानले आणि विद्यार्थी स्वयंसेवकांच्या कायम सहकार्याची कबुली दिली.