नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चारही दोषींना एक फेब्रुवारीला सकाळी फाशी दिली जाणार आहे. दिल्ली न्यायालयानं या नवीन तारखेचा लेखी आदेश जारी केला.
या प्रकरणातल्या एक दोषी मुकेश सिंग याचा दयेचा अर्ज आज राष्ट्रपतींनी फेटाळला. दिल्लीच्या नायब राज्यपालांनी अर्ज फेटाळण्याच्या शिफारशीसह हा अर्ज कालच केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला होता. केंद्रीय गृहमंत्रालयानं आजच हा अर्ज राष्ट्रपतींकडे पाठवून तो रद्द करावा, अशी शिफारसही केली होती.