नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं उच्च क्षमतेचा जी-सॅट-30 हा दळणवळण उपग्रह आज  फ्रेंच गयाना इथून अंतराळात यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं ही माहिती दिली आहे.

हा उपग्रह दळणवळण, दूरचित्रवाणी आणि प्रसारण क्षेत्रात उच्च दर्जाची सेवा पुरवेल. 3 हजार 357 किलो वजनाचा हा उपग्रह 12-सी, आणि 12 KU बँड ट्रांसपाँडरनी युक्त असून तो इनसॅट-4-ए ची जागा घेईल. भारतामधे KU बँडनं, तर आखाती देशात सी बँडनं सेवा पुरवणारा जी सॅट-30 हा उपग्रह 15 वर्षांपर्यंत कार्यरत राहील.