नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या विनेश फोगटनं रोम इथं झालेल्या कुस्ती स्पर्धेत या हंगामातलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं आहे. ५३ किलोग्रॅम वजनी गटाच्या अंतिम फेरीत तिनं इक्वेडोरच्या लुईझा एलिझाबेथ वाल्वेर्ड मेलेन्ड्रेसचा ४-० असा पराभव करत पदक पटकावलं.

भारताच्याच अंशु मलिकनं काल ५७ किलोग्रॅम वजनी गटात रौप्यपदक पटकावलं. तिला नायजेरियाच्या ओडूनायो अदिक्युरोय हिच्याकडून पराभव पत्कारावा लागला.