नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराण आणि अमेरिकेन आपल्यातला तणाव कमी करावा, असं आवाहन रशियाचे काळजीवाहू परराष्ट्र मंत्री सर्जी लावरोव्ह यांनी केलं आहे. युक्रेनचं प्रवासी विमान इराणकडून अपघातात पडल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

इराण रेव्होल्युशनरी गार्डचे मेजर जनरल कासीम सुलेमानी यांच्या हत्येबद्दल त्यांनी अमेरिकेवर टीका केली आहे. इराणचे नेते आयातुल्ला अली खमेनी यांनी इराणी सैन्याकडून अपघातानं हे विमान पडल्याचं म्हटलं आहे. तर इराणनं या घटनेबाबत औपचारिक माफीपत्र करावं, अशी मागणी युक्रेननं केली आहे.