नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि युरोपीय संघ हे नैर्सगिक भागीदार असून येत्या मार्चमध्ये होत असलेली भारत आणि युरोपीय संघातली परिषद फलदायी ठरेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत युरोपीय संघाचे उच्चायुक्त जोसेप बॉरेल फॉन्टेल्स यांच्याशी संवाद साधताना बोलत होते.

युरोपीय संघाबरोबर वातावरण बदल, व्यापार आणि आर्थिक संबंध अधिक बळकट करण्याबाबत भारताच्या प्रतिबद्धतेचा प्रधानमंत्र्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. ब्रुसेल्स इथं होणार्‍या या आगामी परिषदेसाठी युरोपीय संघाचे नेतेही उत्सुक असल्याचं फॉन्टेल्स यांनी म्हटलं आहे.