नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोरखपूर आणि पूर्वांचल राज्यांच्या विकासासाठी लिंक एकस्प्रेस मार्ग अत्यंत महत्वाची भूमिका बजावेल, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. लिंक एक्स्प्रेस-मार्गासाठी आपली जमीन देणार्या शेतकर्यांना गौरवण्यासाठी गोरखपूर औद्योगिक विकास प्राधिकरण कार्यालयाच्या परिसरात सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
उत्तर प्रदेश आणि देशाच्या विकासात महत्वाचं योगदान देण्यात शेतकर्यांचा मोठा वाटा असल्याचं ते म्हणाले. या शेतकर्यांना आपल्या जमिनीचा योग्य मोबदला देण्यात येईल असंही ते म्हणाले. पूर्वांचल एक्स्प्रेस मार्गाचं बांधकाम युध्दपातळीवर सुरू असून यावर्षी मुख्य मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असंही आदित्यनाथ यांनी सांगितलं.