नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आज संपूर्ण देशभर राबवण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्व आरोग्य केंद्रं, रेल्वेस्थानक, बसस्थानक तसंच बाजारपेठांमध्ये केंद्र उभारून ही लस देण्यात येणार आहे.

सर्व नागरिकांनी आपल्या शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांना लस देऊन घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.