नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदर्भातल्या संशोधन संस्थांनी, या क्षेत्रात विपुल प्रमाणात असलेल्या वन उत्पादनं, कोळसा यांसारख्या नैसर्गिक संसाधनाचा योग्य तंत्रज्ञानाच्या वापरानं उपयोग करून घ्यावा असं आवाहन सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या नागपूर इथल्या विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या हिरक महोत्सवी सोहळ्याचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं. त्यानंतर ते बोलत होते.

वृत्तपत्रांसाठी लागणारा कागद, वैद्यकीय उपकरणं, लाकडाचा लगदा अशा प्रकारचा कच्चा माल आपल्याला परदेशातून आयात करावा लागतो. अशा कच्च्या मालाचा पुरवठा देशातूनच व्हावा, यासाठी संशोधन संस्थांनी संबंधित संस्थांच्या सहकार्य आणि समन्वयानं योग्य तंत्रज्ञान विकसित करायला हवं असंही गडकरी म्हणाले. असं घडू शकलं तर ग्रामीण आजवर मागास राहिलेल्या भागांमध्ये उद्योगधंदे वाढू लागतील असं ते म्हणाले.

विश्वेश्वरैय्या संस्थेत तंत्रज्ञान विकास आणि गुवणत्ता केंद्राची स्थापना करण्यासाठी २०० कोटी रुपयांचं आर्थिक सहकार्य देऊ अशी घोषणाही गडकरी यांनी केली.