नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आंध्रप्रदेशातल्या विशाखापट्टणम इथं साडेतीन हजार किलोमीटरपर्यंत मारा करणार्‍या अण्वस्त्र सक्षम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. पाणबुडीवरुनही हे क्षेपणास्त्र सोडता येऊ शकतं.

या चाचणीमुळे भारतानं आएनएस अरिहंत श्रेणीच्या अण्वस्त्र पाणबुडीच्या ताफ्यात आणखी एक क्षेपणास्त्र समाविष्ट करण्याच्या दृष्टीनं पाऊल टाकलं आहे.

संरक्षण, संशोधन आणि विकास संघटनेनं हे क्षेपणास्त्र विकसित केलं आहे. तीन मीटर लांब या क्षेपणास्त्राचं वजन एक टन पेक्षा अधिक आहे.