नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठता यावं म्हणून या प्रक्रियेतल्या सर्व संबंधितांशी समन्वयाची भूमिका सरकार बजावेल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.

चेन्नई इथं नानी पालखीवाला शतक महोत्सवी व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट हे केवळ स्वप्न नसून त्यामागे प्रत्यक्ष विचार आहे, असं त्यांनी नमूद केलं. मोदी सरकार हे अनिर्बद्ध वाढीऐवजी नियोजन पूर्ण विकासावर विश्वास ठेवणारं आहे , असं त्या म्हणाल्या.

केंद्र सरकार येत्या पाच वर्षात १०० लाख कोटी रुपये देशातल्या पायाभूत सुविधांसाठी खर्च करणार आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.