नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिव्यांग व्यक्तींना, उत्तर प्रदेशातल्या महत्वाच्या ठिकाणी व्यावसायिक दुकानं सुरु करता यावीत यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एक विशेष योजना सुरु केली आहे.

उत्तर प्रदेशाचे वाहतूकमंत्री अशोक कटारिया यांनी ही माहिती दिली. आय.आय.टी.च्या माजी विद्यार्थी संघटनेशी संलग्न एका सामाजिक संस्थेच्या सहकार्यानं, राज्यभरातल्या १०० बसस्थानकांच्या ठिकाणी, दिव्यांगांना दुकानं सुरु करून दिली जातील, असं त्यांनी सांगितलं.