नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा हे बिनविरोध पक्षाध्यक्ष म्हणून निवडून येतील, असं जवळपास निश्चित आहे. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया राजधानी दिल्लीतल्या पक्षाच्या मुख्यालयात सुरु आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपाचे नेते नड्डा यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणारी निवेदनपत्रं दाखल करणार आहेत. त्यांच्या निवडीसंदर्भातली औपचारिक घोषणा आज दुपारी केली जाणार आहे. त्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पक्षाच्या मुख्यालयात उपस्थित राहणार आहेत.