नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिजिंगसह संपूर्ण चीनमधे सार्स सारखा गूढ विषाणुचा फैलाव झाला असल्याचं चीननं म्हटलं आहे. या विषाणूमुळे तिघांचा मृत्यू झाला असून, या विषाणूची लागण झालेले 140 रुग्ण आढळले आहेत.

या नव्या विषाणूचा संबंध सार्स विषाणूशी असल्यामुळे लोकांमधे भिती पसरली आहे. सार्स विषाणूमुळे चीन आणि हाँगकाँगमधे 2002-2003 साली सुमारे साडेसहाशे लोकांचा मृत्यू झाला होता.