नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दक्षिण आशियाई देशांमधल्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या संघटनेच्या अध्यक्षपदाचा पदभार काल स्वीकारला. ते २०२० या वर्षासाठी या पदावर कार्यरत असतील.

नवी दिल्ली इथं काल संघटनेची १० वार्षिक बैठक झाली. या बैठकीत संघटनेचे मावळते अध्यक्ष आणि बांगलादेशाचे मुख्य निवडणूक आयुक्त के.एम. नुरुल हुडा यांनी आरोरा यांच्याकडे संघटनेचं बोधचिन्ह सोपवलं.

या संघटनेची स्थापना २०१२ मध्ये झाली होती. ही संघटना जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही प्रदेशांचं प्रतिनिधित्व करते. भारतासह एकूण आठ देश संघटनेचे सदस्य आहेत.