नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि रेल्वेमंत्री आणि पोलाद मंत्र्यांनी आज नवी दिल्लीत पोलाद उत्पादकांबरोबर पोलाद क्षेत्रासमोरची आव्हाने आणि सध्याचा आयात-निर्यात कल याबाबत चर्चा केली.

उभय मंत्र्यांनी पोलाद उद्योगाला आश्वासन दिले की, पुढल्या पाच वर्षात अभियांत्रिकी वस्तूच्या निर्यातीत दुपटीने वाढ आणि 2030 पर्यंत ती 200 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचावी यासाठी वाणिज्य आणि उद्योग तसेच पोलाद मंत्रालय सर्वतोपरी प्रयत्न करेल.

यामुळे भारताच्या निर्यातीलाच केवळ चालना मिळणार नाही तर उत्पादन क्षेत्रात प्रामुख्याने एमएसएमई क्षेत्रात रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल.

पियुष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान यांनी अनावश्यक आयात कमी करण्यासाठी आणि निर्यात वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत विस्तृत चर्चा केली.

या बैठकीला पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते तसेच पोलाद क्षेत्राच्या विविध संघटनांचे सदस्य उपस्थित होते