राज्यात येत्या ३-४ दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विविध भागात आजही मुसळधार पाऊस सुरु असून कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबईतल्या हवामान विभाग कार्यालयाचे...

अधिसूचना जाहीर झालेल्या ठिकाणच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जिथे अधिसूचना जारी झाली असेल तिथे ओबीसी आरक्षणाविना निवडणूक होणार आहे. इतर मागासवर्गीय आरक्षणाबाबत बांठिया आयोगाचा अहवाल राज्य शासनानं सर्वोच्च न्यायालयात...

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती

मुंबई : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला...

राज्यपालांच्या हस्ते दिया मिर्झा, अफरोज शहा मदर तेरेसा पुरस्काराने सन्मानित

मुंबई : पर्यावरण रक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झा तसेच मुंबईतील वर्सोवा सागरी किनारा स्वच्छता मोहीमेचे नेतृत्व करणारे पर्यावरण कार्यकर्ते अफरोज शहा यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते...

पावसामुळे विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमधे १२ जणांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आजही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु असून जलाशयांमधल्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तुरळक ठिकाणी जोरदार...

केंद्र सरकारने ओबीसींना घटनात्मक आरक्षण देण्याची छगन भुजबळ यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने ओबीसींना घटनात्मक आरक्षण देण्याची मागणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. ते काल नवी दिल्ली इथं ऑल इंडिया सैनी समाज संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत...

पूर परिस्थिती पाहणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचिरोलीला रवाना

नागपूर :  गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी सव्वाचार वाजता  नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूर व परिसरात मुसळधार...

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर कुठलीही कारवाई न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर पुढील आदेशापर्यंत सुनावणी घेऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभेच्या अध्यक्षांना दिले आहेत. राज्यातल्या राजकीय परिस्थिती संदर्भातल्या याचिकांची तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती उध्दव...

पालघर जिल्ह्यात फुफ्फुसांत संसर्ग झाल्याने मुलीचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात डहाणू आदिवासी विकास प्रकल्पातल्या झाई शासकीय आश्रमशाळेत नऊ वर्षांच्या एका मुलीला फुफ्फुसांत संसर्ग झाल्यानं काल मृत्यू झाला.  मृत  विद्यार्थीनीचं शवविच्छेदन मुंबईच्या  जे.जे. रुग्णालयात झालं. त्यात...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘सुंदर माझे कार्यालय अभियान’ पुरस्काराचे वितरण

'सुंदर माझे कार्यालय' उपक्रम राज्यातील सर्व कार्यालयात कार्यक्षमपणे राबवावा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर : सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेला 'सुंदर माझे कार्यालय' हा उपक्रम स्तुत्य असून राज्यातील सर्व शासकीय...