नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इजिप्तच्या उत्तरेकडील सिनाई भागात काल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १७ दहशतवादी ठार झाले आहेत.

गुप्तचर विभागानं दिलेल्या माहिती वरून पोलिसांनी ही कारवाई केली, अशी माहिती अंतर्गत मंत्रालयानं दिली आहे. आयसीसीच्या मदतीनं लढणाऱ्या बंडखोरांबरोबर  गेली अनेक वर्ष सुरक्षादल लढत आहे.

इजिप्तनं २०१८ पासून या बंडखोरांविरोधात राष्ट्रव्यापी मोहीम सुरु केली आहे.