नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या कुठलाही विद्यार्थीच्या गुणपत्रिकेवर यापुढे अनुतीर्ण असे लिहिले जाणार नाही.
बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यात विद्यार्थी अपयशी झाला तरी त्याच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण असा इशारा न लिहिण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. त्याऐवजी पुर्नपरीक्षेसाठी पात्र असा शेरा गुणपत्रिकेवर लिहिला जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालापासून हे बदल लागू होणार आहेत.
सध्या चालू असलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकलेले विद्यार्थी जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या पुरवणी परिक्षेसाठी पात्र ठरतील. त्यावेळी एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर पुर्नपरीक्षेसाठी पात्र हा शेरा लिहिला जाईल.
तर त्यापेक्षा अधिक विषयात उत्तीर्ण होण्यात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कौशल्य विकास कार्यक्रमासाठी पात्र असा शेरा लिहिला जाणार आहे. सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हीच पद्धत लागू आहे.