पुणे : मातंग समाज  व तत्‍सम 12 पोटजातीतील इ.10 वी, 12 वी, पदवी, पदव्‍युत्‍तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. अभ्‍यासक्रमामध्‍ये विशेष प्राविण्‍य 70 टक्‍के पेक्षा जास्‍त गुण मिळवून उत्‍तीर्ण झालेल्‍या विद्यार्थी- विद्यार्थीनीना साहित्‍यरत्‍न अण्‍णाभाऊ साठे शिष्‍यवृत्‍ती गुणानुक्रमे मंजूर करण्‍यात येणार असून  सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात इ.10 वी, 12 वी,पदवी, पदव्‍युत्‍तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. अभ्‍यासक्रमामध्‍ये विशेष प्राविण्‍य मिळालेल्‍या विद्यार्थ्‍यांनी आपले अर्ज जिल्‍हा व्‍यवस्‍थापक, साहित्‍यरत्‍न लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन सर्व्‍हे नंबर 103,104 मेन्‍टल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलिस स्‍टेशन समोर, येरवडा, पुणे येथे पुढील कागदपत्रांसह सादर करावेत.

आवश्यक कागदपत्रे- साध्‍या कागदावर फोटो लावून अर्ज भ्रमणध्‍वनीसह, जातीचा दाखला, शाळा सोडल्‍याचा दाखला, रेशन कार्ड शिधापत्रिका छायांकित प्रत, गुणपत्रक, पुढील वर्गात प्रवेशाबाबतचा पुरावा.

मातंग समाज व तत्‍सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्‍यांनी आपले अर्ज कागदपत्रांच्‍या छायांकीत प्रती स्‍वयंसाक्षांकित करुन वरील पत्‍त्‍यावर या कार्यालयाकडे दि. 20 जून 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत पोहोचतील अशा बेताने सादर करावेत, असे अवाहन पुणे जिल्‍हा व्‍यवस्‍थापक यांनी केले आहे.