नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांमधल्या महिलांचा यश साजरं करुन अधिक लिंगभाव समान जग निर्माण करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केले.
देशवासियांनी लिंगविषयक भेदभाव आणि महिला अत्याचार मूळीच खपवून घेऊ नये असे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केलेल्या ट्विट संदेशात नायडू यांनी म्हटले आहे.






