नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वचं क्षेत्रांत महिलाचे सक्षमीकरण करण्याच्या आपल्या निश्चयाशी सरकार वचनबद्ध आहे असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

महिला सक्षमीकरण आणि लिंगभाव समानता साध्य करण्याबाबतच्या प्रगतीचा परामर्श घेण्याची संधी या महिला दिनामुळे प्राप्त होते असे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या संदेशात संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे.