नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा संसर्ग सुमारे १०० देशांमध्ये पसरल्यानं, या साथीचं रुपांतर आता सर्वव्यापी जागतिक साथीच्या रोगात झाल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेचं व्यक्त केलं आहे.

कोरोनाबाधित राष्ट्रांमधल्या सरकारांनी, संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी जागरुकपणे लढा दिल्यानं रोगाचा संसर्ग नियंत्रित स्वरुपात राहिल्याचं जगाच्या इतिहासातलं हे एकमेव उदाहरण असेल, असं डब्ल्यू.एच.ओचे महासंचालक टेड्रोस घेब्रेसेयस यांनी म्हटलं आहे.

गेल्या डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान शहरातनं सुरू झालेल्या या संसर्गानं ३ हजार ८१७ बळी घेतले आहेत, तर १ लाख दहा हजार २९ संशयित रुग्ण आहेत.