नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी आपले चांगले संबंध असून आपल्याला चीनविषयी आदर आहे, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ते काल पत्रकारांशी बोलत होते.

चीनमधे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रारंभ होऊन तो हाताबाहेर जाणं दुर्देवी असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पॉम्पियो यांनी सांगितलं की, या विषाणू संसर्गाची माहिती द्यायला चीननं उशीर केल्यामुळे जगभरात मानवजातीला या रोगाचा धोका निर्माण झाला आहे.

अमेरिकेत आतापर्यंत या आजारामुळे 230 जणांचा मृत्यू झाला असून 18 हजार जणांना संसर्ग झालं आहे. जगातल्या 160 देशांमधे मिळून सुमारे पावणेतीन लाख लोकसंख्या या आजाराच्या प्रभावाखाली असून आतापर्यंत 11 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.