नवी दिल्ली : इस्रोने भारताची स्वत:ची क्षेत्रीय दिशादर्शक उपग्रह प्रणाली सुरु केली असून, तिचे नाव ‘नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन’-नाविक असे आहे. एप्रिल 2018 पासून ती कार्यरत आहे.
या प्रणालीची क्षमता विविध उपयोजन क्षेत्रात जसे की वाहन माग यंत्रणा, मोबाईल, मत्स्यव्यवसाय, सर्वेक्षण इत्यादी क्षेत्रात सिद्ध केली जात आहे. उदाहरणार्थ 1 एप्रिल 2019 पासून नोंदणीकृत सर्व व्यावसायिक वाहनांसाठी ट्रॅकर्स बंधनकारक असून, ते ‘नाविक’ सक्षम आहेत. यामुळे अमेरिकेच्या जीपीएसवरील अवलंबित्व कमी करता येईल.
अणुऊर्जा आणि अंतराळ खात्याचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.