नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदी मुळे भरडलेल्या चित्रपट सृष्टीतल्या रोजंदारी करणाऱ्या कामगारांच्या बँक खात्यामध्ये अभिनेता सलमान खानने पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, अशी माहिती चित्रपट कामगार संघटनेचे अध्यक्ष बी एन तिवारी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याचा निर्णय सलमान खाननं घेतला आहे.
आतापर्यंत रोजंदारी करणाऱ्या तेवीस हजार कामगारांची सूची सलमान खानला दिली आहे. याशिवाय बॉलिवूड अभिनेता अजय देवगन आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी देखील प्रत्येकी 51 लाख रुपयांची मदत केली आहे. प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया या चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेकडून दीड करोड रुपयांची ची मदत मिळाली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी एक लाख कामगारांना शिधा देण्याचं आश्वासन दिलं आहे. आतापर्यंत जमा झालेले तीन कोटी रुपये पाच लाख कामगारांमध्ये वाटलं जाणार आहे. 14 एप्रिल पासून टप्प्याटप्प्याने कामगारांना पैसे दिले जाणार आहेत, असही तिवारी यांनी सांगितलं.