नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन या मलेरियारोधक औषधासह एकूण 5 टन औषधं पाठवल्याबद्दल, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. भारतानं ही औषधं दिल्याबद्दल इस्रायली जनता मोदी यांची ऋणी आहे असं ट्वीट नेतन्याहू यांनी केलं आहे.