बारामती : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती शहरामध्ये आगमन झाले. पाटस रोड येथे प्रशासनाच्या वतीने ‍ प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी पालखी रथ आणि दिंडयाचे स्वागत केले. यावेळी त्यांच्यासमवेत तहसिलदार विजय पाटील व विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.