नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातले अनेक देश कोरोना विषाणूमुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेची चाकं पुन्हां फिरवण्याची तसंच या महामारीची दुसरी लाट थोपवण्याची तयारी करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर कोविड १९ विषाणू आपल्याबरोबर दीर्घ काळ राहील असं  जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी संचालक डॉ. मिशेल रायन म्हटलं आहे.

कोविड १९ ला रोखण्यासाठी अद्याप  कुठलीही लस नसल्यानं त्याला प्रतिकार करण्याची क्षमता मानवी शरीरात विकसित व्हायला अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे. कोविड १९ विषाणू एच आय व्ही विषाणूप्रमाणे जगात कायमही राहू शकतो, असं त्या म्हणाल्या.