नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव आज सकाळपासून पूर्ववत सुरू झाले. लासलगाव इथं कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानं कांद्याचे लिलाव बंद केले होते.
विंचूर बाजार समिती प्रतिबंधित क्षेत्रात असल्यानं या भागातला कांदा लिलाव मात्र बंद आहे. आज सकाळी लासलगाव बाजार समितीत २०० वाहनांमधून कांद्याची आवक झाली असून, कांद्याचे दर ३५० ते ६५० रुपये प्रति क्विंटल असे होते.






