नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मुळे चित्रपट उद्योगासमोर निर्माण झालेलं आव्हान लक्षात घेता, पुढील वर्षी होणारा ९३ वा ऑस्कर पुरस्कार सोहोळा निर्धारित दिवसाच्या ८ आठवडे  पुढे , २५ एप्रिल २०२१ रोजी आयोजित करण्याचा निर्णय ऑस्कर पुरस्कार नियोजन मंडळानं घेतला आहे. ऑस्कर पुरस्कारांच्या इतिहासात चौथ्यांदा हा सोहोळा पुढे ढकलण्यात आला आहे.