नागपूर : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

रामगिरी येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर देशमुख, डॉ. मिलींद माने, समीर मेघे, विभागीय आयुक्त‍ डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महानगरपालिका आयुक्त रविंद्र ठाकरे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, मुख्यमंत्री सचिवालयाच्या विशेष कार्य अधिकारी श्रीमती आशा पठाण यांनी यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.