मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कडक निर्बंध लादताना विविध क्षेत्रांचा विचार झालेला नाही. विविध क्षेत्र त्यामुळे प्रभावित झालं आहे. अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसला आहे, अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी वार्ताहरांशी बोलताना केली आहे.

हे लॉकडाऊनसदृश निर्बंध आहेत अशी टीकाही त्यांनी केली. व्यापारी आणि व्यायसायिकांमधे त्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. या सरकारच्या बोलण्यात आणि करणीत फरक असल्याची टिका देखील त्यांनी केली.

छोट्या छोट्या घटकांशी चर्चा करून त्यांना दिलासा द्यावा अशी विनंती त्यांनी केली. गरीबांचं जीवन आणि अर्थकारण प्रभावित होणार नाही, अशा पद्धतिनं नव्यांनं निर्बंधाबाबतची अधिसूचना जारी करावी, असंही ते म्हणाले. केंद्र सरकारने लसीकरणाबाबत योग्य नियोजन केलं असून राज्य सरकारने लसींच्या पुरवठ्याबाबात केंद्राकडे बोट दाखवू नये, स्वतःचं व्यवस्थापन सुधारावं असा टोलाही त्यांनी लगावला.