मुंबई (वृत्तसंस्था) : कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारची धरसोड वृत्ती, कांद्याचे घसरते दर आणि त्यामुळे कांदाउत्पादकांची आर्थिक कोंडी होत आहे असा आरोप करत शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेनं आज नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथल्या राष्ट्रीय महामार्गावर टेहरे इथं आंदोलन केलंलं. यावेळी आंदोलकांनी सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत संताप व्यक्त केला. संघटनेचे अध्यक्ष ललित बहाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आंदोलकांनी घोषणाबाजी करत रस्त्यावर कांदा ओतला. सध्या कांद्याचे भाव खाली आल्यामुळे किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत खरेदी केलेला कांदा सरकारने बाजारात आणू नये,गेल्या काळात केलेल्या कांदा निर्यात बंदीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं भरपाई द्यावी,जीवनावश्यक वस्तुंच्या सुचितून कांद्याला कायमस्वरुपी वगळण्यात यावं तसचं भाव स्थिरीकरण योजना रद्द करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.