नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया इथं जंगलात लागलेल्या वणव्यानंतर राज्यात पसरलेल्या आगीमुळे इथले गव्हर्नर गॅवीन न्युसम यांनी राज्यात आणीबाणी घोषित केली आहे. या आगीत अनेक घरं उद्धस्त झाली असून, अनेक वायनरींचं नुकसान झालं आहे. यामधे १८६९ साली स्थापन झालेल्या प्रतिनिधी वायनरीचा समावेश आहे.

या ठिकाणी वाहत असलेल्या ताशी १४५ किलोमीटर वेगाच्या वाऱ्यामुळे ही आग वेगानं पसरत आहे. ३००० पेक्षा अधिक अग्निशामक आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.