नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य दिवस हा ग्रह निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या लोकांचा सन्मान आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

आरोग्य सेवेमधील नवे संशोधन आणि नव्या प्रणालीच्या प्रती आपली कटिबद्धता व्यक्त करणायाचाही हा दिवस असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या टि्व्टर संदेशात म्हटलं आहे. आपल्या या संदेशात त्यांनी नागरिकांना मास्क वापण्याचे वारंवांर हात धुण्याचे त्याच प्रमाणे मार्गदर्शक सूचना पालन करण्याचेही आवाहन केले.