नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणासाठी आता व्हॉट्सअॅप या समाज माध्यमावरूनही नाव नोंदणी करता येणार आहे. केंद्रिय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. यासाठी ९०१३१५१५१५ या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅप संदेश पाठवावा लागेल. त्यानंतर येणाऱ्या सहा अंकाच्या ओटीपी क्रमांकाचा वापर करून नागरिकांना लसीकरणासाठीची तारीख, ठिकाण आणि कोणती लस हे निवडता येईल असं मांडविया यांनी ट्विटरवरून सांगितलं आहे.