हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्यानंतर त्यांना तातडीन रुग्णालयात हलवण्यात आलं होते.

नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालंय. मृत्यूसमयी त्या ६७ वर्षांच्या होत्या. आपल्या राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्यानंतर त्या जागीच कोसळल्या. त्यानंतर गोंधळाच्या वातारणात त्यांना तातडीनं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा नेते हर्षवर्धन एम्स रुग्णालयात दाखल झाले.

जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर लोकसभेतही बहुमतानं मंजूर करण्यात आलंय. सोमवारी राज्यसभेत १२५ विरुद्ध ६१ तर, मंगळवारी लोकसभेत ३७० विरुद्ध ७० अशा बहुमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलंय. यावरच, मंगळवारी सायंकाळी ७.२३ वाजता सुषमा स्वराज यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया व्यक्त केली होती. हेच त्यांचं अखेरचं ट्विट ठरलं.