मुंबई: बियॉन्डस्कूल ही मुलांसाठीची भारतातील पहिली लाइव्ह ऑनलाइन अपस्किलिंग अकॅडमी आहे. व्यावहारिक जगात मुलांकरिता आवश्यक असणा-या कौशल्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे. एखाद्या विषयाचे ज्ञान महत्त्वाचे असले तरीही बियॉन्डस्कूलमध्ये मुलांना लॉजिक, अॅनलेसिस, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन आणि कम्युनिकेशन यासारख्या हायर ऑर्डर थिंकिंग स्किल विकसित करण्यासाठी मुलांना सक्षम केले जाते. त्यामुळे मुलांचे ‘नॉलेज अक्वायर्स’वरून ‘नॉलेज मल्टीप्लायर्स’ मध्ये परिवर्तन केले जाते.’
लहान वयातच मुलांचा ‘मल्टीपल इंटेलिजन्स’ विकसित करण्याच्या दृष्टीकोनावर आधारीत ‘प्रायमरी इयर्स एनरिचमेंट प्रोग्राम’ हा अशा प्रकारचा पहिलाच प्रोग्राम आहे. यात स्टेम इनोव्हेशन, लीडरशिप कम्युनिकेशन आणि लॉजिमॅथ प्रॉब्लेम सॉल्व्हर कोर्सचा समावेश असून याद्वारे मुलांचा आयक्यू (इंटेलिजन्स कोशंट) अधिक धारदार करणे, इक्यू (इमोशनल कोशंट) मजबूत करणे तसेच सीक्यू (क्रिएटिव्ह कोशंट) वाढवण्याद्वारे संपूर्ण यशासाठी मुलांची तयारी करून घेतली जाते.
बियॉन्डस्कूलच्या संस्थापक व सीईओ पायल गाबा म्हणाल्या, “बियॉन्डस्कूल हे अपस्किलिंग ऑनलाइन लर्निंग सोल्युशन असून ते एका पालकाकडून अनेक पालकांसाठी तयार करण्यात आले आहे. मुलांमध्ये हायर ऑर्डर थिंकिंग स्किल विकसित करण्याचा विचार प्रथम एक पालक म्हणून आणि नंतर एक बिझनेस लीडर म्हणून माझ्या डोक्यात आला. शालेय शिक्षण महत्त्वाचे आहेच, मात्र शाळेपलिकडील कौशल्य विकास अनिवार्य असावा, यावर बियॉन्डस्कूल संस्थेचा विश्वास आहे. याच प्रेरणेने आमचा ‘प्रायमरी इयर्स एनरिचमेंट प्रोग्राम’ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक तज्ञांसोबत मिळून तयार करण्यात आला आहे.”